दीडघरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन दोन घराला आग…. सुमारे दहा लाखाचे नुकसान  महाराष्ट्र

रमाकांत वासुदेवराव मोरे बुरहानपुर

दीडघरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन दोन घराला आग…. सुमारे दहा लाखाचे नुकसान  महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील दीड घर येथे मंगळवार रोजी सकाळी घरगुती वापरत असलेल्या गॅस सिलेंडरची गळती होऊन सिलेंडरच्या स्पोटात लागलेल्या भिषन आगित शेजारील दोन घरे आगीत जळाली असुन यामध्ये दोन्ही घरामधील साहित्यासह सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला असून महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे

दीडघर तालुका भोर येथील यमुना रघुनाथ बांदल व दिनेश काशिनाथ बांदल यांची एकाच वाड्यात असलेली शेजारी शेजारी ची दोन घरे या आगीत जळाली आहेत ग्रामस्थांसह दोन अग्निशामक दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु लाकडी तुळई व कौलारू घरे पूर्ण जळून खाक झाली मंगळवार दिनांक 2 सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एका घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्पोर्ट झाल्याचा आवाज आला व घराचे छप्पर जुळू लागलेचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले ते पाहुन दिनेश बांदल हे त्यांच्या नवीन बांधलेल्या घरामध्ये होते ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला याचवेळी तेथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बांदल यांनी पीएमआरडीच्या अग्निशामक केंद्रास तसेच भोर नगरपालिकेच्या अग्निशामक केंद्रास फोन करून माहिती दिली काही वेळाने पीएमआरडीच्या अग्निशामक केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या त्यांच्या साह्याने ग्रामस्थांनी सुमारे तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आगीमध्ये घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या घरातील साठवलेले गहू तांदळाचे कडधान्य घर प्रपंचातील इतर सर्व साहित्य घराची छप्पर सागवान लोखंडी बॅटम कपडे लत्ते रोकड व साडेपाच तोळे सोने नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे घटनास्थळी नसरापूरचे मंडल अधिकारी प्रदीप जावळे ग्राम महसूल अधिकारी सचिन ढोरे ग्रामविकास अधिकारी सरला नलवडे यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली महसूल अधिकारी ढोरे यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला यावेळी पोलीस पाटील नीता सोनकर व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत होता ।

About Author

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!